रविवार, 26 अक्टूबर 2014

श्री गणपती स्तोत्र

नमस्ते गणनाथाय गणानां पतये नमः I
भक्तिप्रियाय देवेश भक्तेभ्यः सुखदायक II१ II
स्वानन्दवासिने तुभ्यं सिद्धिबुद्धिवराय च I
नाभिशेषाय देवाय ढुण्ढिराजाय ते नमः II २ II
वरदाभयहस्ताय नमः परशुधारिणे I
नमस्ते सृणिहस्ताय नाभिशेषाय ते नमः II३ II
अनामयाय सर्वाय सर्व पूज्याय ते नमः I
सगुणाय नमस्तुभ्यं ब्रह्मणे निर्गुणाय च II४ II
ब्रह्मभ्यो ब्रह्मदात्रे च गजानन नमोsस्तु ते I
आदिपूज्याय ज्येष्ठाय ज्येष्ठराजाय ते नमः II५II
मात्रे पित्रे च सर्वेषां हेरम्बाय नमो नमः I
अनादये च विघ्नेश विघ्नकर्त्रे नमो नमः II ६ II
विघ्नहर्त्रे स्वभक्तानां लम्बोदर नमोsस्तु ते I
त्वदीयभक्तियोगेन योगीशाः शान्तिमागताः II७II
II इति श्री गणपति स्तोत्रं संपूर्णं II

श्री गणपती स्तोत्र
मराठी अर्थ:
भक्तांना सुख देणाऱ्या हे देवेश्वरा,
आपण भक्तीप्रिय आणि गणांचे
अधिपती आहात. हे गणनाथ
मी आपल्याला नमस्कार करतो.
आपण स्वानंद लोकाचे वासी आहात
आणि आपण सिद्धीबुद्धीचे
प्राणनाथ आहात.
आपल्या नाभिमध्ये शेषनाग भूषण
रूपाने विराजमान आहेत. हे
ढुण्ढिराजा देवा आपल्याला मी
नमस्कार करतो. आपल्या हातामध्ये
वरद आणि अभय मुद्रा आहेत. आपण
परशु धारण करणारे आहात.
आपल्या हातामध्ये अंकुश शोभत आहे.
आपल्या नाभिमध्ये नागराज
विराजमान आहेत.
आपल्याला मी नमस्कार करतो.
आपण रोगरहित, सर्वस्वरूप
आणि सर्वाना पूजनीय आहात.
मी आपल्याला नमस्कार करतो.
आपणच सगुण व निर्गुण ब्रह्म आहात.
मी आपल्याला नमस्कार करतो.
आपण ब्राह्मणांना ब्रह्मज्ञान
देणारे आहात. हे
गजानना मी आपल्याला नमस्कार
करतो. आपण प्रथम पूजनीय, ज्येष्ठ
आणि जेष्ठराज आहात.
आपल्याला मी नमस्कार करतो.
सर्वांचे माता-पिता असलेल्या हे
हेरंबा मी आपल्याला वारंवार
नमस्कार करतो. हे विघ्नेश्वर, आपण
अनादी आहात आणि विघ्नांचे
निर्माते आहात.
आपल्याला मी वारंवार नमस्कार
करतो. हे लंबोदर! आपण
भक्तांच्या विघ्नांचे हरण करणारे
आहात. आपल्याला मी नमस्कार
करतो. योगीश्वर
आपली भक्ती करून
शांती मिळवितात. म्हणून आपण
आम्हाला सुखशांती द्यावी. इथे हे
गणपती स्तोत्र संपूर्ण झाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें